आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबियांच्या नावे दूरध्वनी क्रमांक संबधित असल्याबाबत बिलाची पावती खातरजमा करून थेट कैदी कुटुंबाशी बोलणे करू शकणार आहेत. आधीची किचकट प्रक्रीया टळणार असून ही कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदवार्ता ठरली आहे.
कारागृहातील मुलाखतीसाठी बंदी पात्र आहेत, परंतू बंद्यांचे पोलीस पडताळणी अहवाल पोलीस विभागाकडून प्राप्त होण्यास विलंब लागतो.त्यामुळे बंद्यांची त्यांचे नातेवाईकांशी दूरध्वनी वरून संपर्क होत नसल्याने मानसिक स्थिती खालावली जाते.त्यामध्ये सुधारणा व्हावी याकरीता दूरध्वनी सुविधा पात्र बंद्याचे नातेवाईक यांचे फोन नंबर पोलिस विभागाकडून पडताळणी करूनच त्यांना या सुविधेचा लाभ देण्यात येतो. मात्र, फोन पडताळणी करीता पोलीस प्रशासनाकडून विलंब होत असल्याने बंद्यामध्ये असमाधानाचे वातावरण तयार होऊन कुटुंबातील सदस्यांशी संपर्क न झाल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडते. त्यामुळे आता, दूरध्वनी क्रमांक संबधित कुटुंबियांच्या नावे असल्याबाबत बिलाची पावती खातरजमा करून थेट कैदी कुटुंबाशी बोलणे करू शकणार आहे.
अपर पोलीस महासंचालक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,पुणे विभागाने बंद्यांच्या दूरध्वनी सुविधेमध्ये सुधारणा,वाढ करण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये सुसूत्रता आणणेकरीता अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक,राज्य महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांनी अधिनस्त सर्व कारागृहाचे अधीक्षक यांना परिपत्रक पाठवून, कारागृहातील जे बंदी मुलाखतीसाठी पात्र आहेत.
अशा बंद्यांना मोबाईल,दूरध्वनीद्वारे त्याच्या कुटुंबीयांना मुलाखत द्यावयाची असल्यास,ज्या मोबाईल,दूरध्वनी नंबरवर कॉल करावयाचा आहे. तो दूरध्वनी क्रमांक संबधित कुटुंबियांच्या नावे असल्याबाबत बिलाची पावती कारागृह प्रशासनाने मागवून घेऊन खात्री करावी व अश्या प्रकरणी पोलीस पडताळणीची आवश्यकता नाही. बंद्याना दूरध्वनीद्वारे मुलाखतीची सुविधा देण्याबाबत निर्देश पारित केलेले आहेत.
यामुळे कारागृहातील बंद्याकरीता देण्यात येणाऱ्या सुविधा यांचा योग्य वापर करून बंदी व नातेवाईक यांचेमधील सुसंवाद वाढीस लागून त्यांचेमध्येही कारागृह प्रशासना बद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल आणि त्यांचे कुटुंबाशी असलेले नाते अजून सदृढ होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.