आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहित नाही.'' असे वक्तव्य काॅंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
राष्ट्रवादीने इथे उमेदवार उभा केला
निपाणी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आपला उमेदवार उभा केलाय असं मी ऐकलेय. काय झालेय ते अजून आमच्यासोबत आहेत. किती दिवस थांबतील माहित नाही कारण भाजपसोबत रोज बोलणी सुरु आहे.
रोज बातम्या येतात
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रोज बातम्या येतात की कोण नेता जाणार, कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावे. पण काय झाले? राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन स्वत:ची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असे त्यांना वाटत असावे,
संजय राऊतांची प्रतिक्रीया
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला त्याविषयी माहिती नाही. मला इतकंच माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. काल आपण आमची एकी आणि वज्रमूठ पाहिली. काल व्यासपीठावर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण असे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.