आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुण्यात प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांनी पक्षात प्रवेश केला. शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केली असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस व्यक्त केला.
आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे यामुळे राजकारणात प्रवेश केला असल्याचे प्रिया बेर्डेंनी बोलून दाखवले. यासोतबच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड का केली याचे कारणही सांगितले आहे. शऱद पवार साहेबांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षाची निवड केली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना ठाऊक आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीकडून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने 3 हजार लोक कलावंतांना प्रत्येकी 3000 रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता. हा उल्लेखही प्रिया बेर्डे यांनी बोलताना केला.
पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, 'मला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्याविषयी तळमळ वाटते. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकते. मी स्वतःला नेता म्हणणार नाही. कारण आम्ही सगळे जण एकत्र काम करणार आहोत. माझा अभिनयही सुरूच राहणार आहे. तसेच अभिनय सुरुच सुरूच राहणार असल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.