आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Problems Of 42 Suicidal Families In Maratha Agitation Should Be Sorted Out, Otherwise We Will Agitate In Front Of Residence, Protesters Warn CM

मराठा क्रांती ठोक मोर्चा:मराठा आंदोलनातील 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा निवासस्थानासमोर आंदोलन करु, आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा प्रभाव असतानाच मराठा बांधव पुन्हा एकदा पेटून उठले आहेत. मराठा आंदोलनातील 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मार्गी लावावे नाहीतर वर्षा समोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात यावा अशी मागणी तातत्याने मराठा बांधवांकडून केली जात आहे. आता त्यांनी थेट आंदोलनांचा इशारा दिला आहे. मागणी मान्य केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. यावेळी त्यांनी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्या प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी मराठा बांधवांनी लावून धरली होती. यावेळी आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या 42 बांधवांनी बलिदान दिले. यानंतर सरकारकडून या प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. यासोबतच कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही. याच कारणामुळे आता मराठा बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.