आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गालिच्या:देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवती गालिच्याची पुण्यात निर्मिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिच्याची निर्मिती केली आहे. या १००० स्क्वेअर फूट गालिच्याची जागतिक स्तरावरही नोंद घेतली जात आहे. पुणे - सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीजवळ पेठ नायगाव येथे पर्यावरण प्रेमींनी गालीचा निर्मितीचा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर पर्यावरण प्रेमी भेट देत आहेत. प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये नैसर्गिकरित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालीचा तयार करण्यात आला आहे. हा गालिचा केवळ घरामध्येच नव्हे तर मोठ्या स्तरावर क्रीडांगणामध्ये, उद्यानांमध्ये, गोल्फ कोर्समध्ये, घराच्या परसबागेमध्ये ही वापरता येऊ शकतो. हा गालिचा वापरण्यासाठी अतिशय सोपा असून देखभाल खर्चही अतिशय कमी आहे. दोन ते तीन दिवसांतून एकदा या गालीच्याला पाणी दिले तरी हा गालिचा अत्यंत हिरवागार आणि टवटवीत राहतो.

हा गालिचा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच तसेच शारीरिकदृष्ट्याही या गालिचाचे अनेक फायदे आहेत. या गालीच्यावर चप्पल न घालता चालल्यास आपल्या आरोग्यासाठी उपयोग होतो. या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना तसेच तरुणांनाही उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी मदत होऊ शकेल. यामधून स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. हा गालीचा काळ्या माती बरोबर समुद्रालगत असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या आणि कोकणातील लाल मातीतही अत्यंत चांगल्या प्रकारे वाढू शकतो. हे गवत कमी पावसाच्या तसेच जास्त पावसाच्या प्रदेशातही चांगल्या प्रमाणात वाढते. पावसाचे प्रमाण अधिक असेल तरीही या गालिच्यामधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.

१००० स्क्वेअर फूट पासपालम ग्रास गालिच्याची जागतिक स्तरावर होतेय नोंद घर अाणि बागेसाठी उपयुक्त नैसर्गिकरीत्या तयार करण्यात आल्याने या गालिच्यामध्ये कोणत्याही विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य होऊ शकत नाही. त्यामुळे हा घरामध्ये आणि बागेमध्येही अतिशय संरक्षितदृष्ट्या वापरता येऊ शकतो. पुण्यासह कोचीन, हैदराबाद या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर या गालिच्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये घरपोच हा गालिचा पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचवण्याची सोयही करण्यात आल्याचे जिबॉय तांबी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...