आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे म्‍हणाले:महिला उद्योगात आल्यास  देशाची प्रगती

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एकूण उद्योग जगतात महिला फक्त १४ टक्केच आहेत. परंतु अलीकडे महिलांचे उद्योग क्षेत्रात प्रमाण वाढत आहे. ते ३० टक्के झाले पाहिजे. महिला जर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आल्या तर देश प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी व्यक्त केला. फिक्की महिला आघाडीने राष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात केले होते, त्यावेळी ते बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, फिक्की ही संस्था महिला उद्योजकांसाठी फार मोठे काम करीत असून या संस्थेला बरोबर घेऊन पुण्यात लवकरच महिला उद्योजक निर्माण व्हावे यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग विभागामार्फत प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या केंद्रातून ग्रामीण महिलांना लघु व हस्तकला तसेच इतर उद्योगाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...