आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालीचरण महाराज यांचे पुण्यामध्ये वक्तव्य:सहिष्णुतेचा अपप्रचार हिंदू धर्माला मारक

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात काही ठिकाणी विशिष्ट समुदायातल्या युवकांवर जमावाने हिंसेच्या घटना घडत आहेत. अशा घटनांबद्दल मनात कोणतीही खंत नाही. हिंदू धर्माचे कार्यच दुष्टांचे निर्दालन करणे हे आहे. त्यामुळे अशा हिंसेचे मी उघड समर्थनच करतो.

या धर्मजागरण सभेचा उद्देश जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाची मोट बांधून कट्टर हिंदू व्होटबँक बनविणे हा आहे. अशी व्होट बँक बनविणे हेच साधूंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू या न्यायाने मी माझे कार्य करीत आहे, असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.

संविधान उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष शब्दच नव्हता कालीचरण महाराज म्हणाले, धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेत नव्हता. तो शब्द इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्तीद्वारे घुसवला. त्यामुळे अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेला काहीच अर्थ नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ यांच्या अंगी नेतृत्त्व करण्याची क्षमता त्यांच्या आहे.

बातम्या आणखी आहेत...