आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी महाअधिवेशन:धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी कायदा करा : वारकरी संप्रदाय

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. स्वतःची मुले काय करतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इंग्रजांनी वैदिक सनातन शिक्षण व्यवस्था मोडून मेकॉले शिक्षण व्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदूंनी पक्ष आणि जाती यामध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे प्रतिपादन अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी आळंदी येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केले. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा, गड आणि दुर्ग यावरील अतिक्रमणे त्वरित हटवावी, अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली.

आळंदी येथे देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य राज्यव्यापी १६ वे वारकरी महाअधिवेशन’ वातावरणात पार पडले. या अधिवेशनात महत्वपूर्ण ठराव संमत केले. यात सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत, बिअर बार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत, महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करावी.

बातम्या आणखी आहेत...