आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव पार्कमधील घटना:मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडमधील तरुणी ताब्यात

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव पार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील तरुणींसह ५ जणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज सेंटरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरेगाव पार्कमधील मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून ५ तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात अाली. ताब्यात घेतलेल्या ३ तरुणी थायलंडमधील आहेत. याप्रकरणी मसाज सेंटरचालकासह दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.