आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडे यांच्या विरुध्‍द आंदोलन:महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे मनोहर भिडे यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान भवनामध्ये महिला पत्रकार संभाजी भिडे यांच्याशी बोलायला गेली असता ‘पोरी पहिले कुंकू लाव, नंतर माझ्याशी बोल’ असे बोलून तिला हुसकावून लावले. महिलेचा जाहीर अपमान केला. त्यामुळे मनोहर भिडे यांच्याविरोधात महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्य उपाध्यक्ष संगीता तिवारी म्हणाल्या की, आपला महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. माँ जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, इंदिरा गांधी, कल्पना चावला यांनी कुंकू न लावता आपले सामर्थ्य या देशात सिद्ध केले आहे. आम्ही महिलांनी कुंकू लावावे किंवा नाही, हा आमचा निर्णय आहे. देशामध्ये लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानुसार आपण स्वत: आपले निर्णय घेऊ शकतो. संभाजी भिडेंनी आम्हाला संस्कारांचे शिक्षण देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...