आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या भुत्तो यांचा निषेध

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुत्तो जरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ फलटण शहर व तालुका भाजपच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत पाकिस्तानचा व पाकिस्तानी विदेश मंत्र्याचा जाहीर निषेध व्यक्त करत पुतळ्याला जोडे मारत पाकिस्तानी विरोधी घोषणा दिल्या.

या वेळी रणजिंतसिंहनिंबाळकर निषेध व्यक्त करताना म्हणाले, पाकिस्तान दहशतवाद्यांचे केंद्रस्थान आहे. नरेंद्र मोदी किंवा आपला देश दुसऱ्यावर युद्ध लादून किंवा आतंकवादी हल्ले करून दुसऱ्याच्या जागा बळकवण्यात आपल्या देशाच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे पंतप्रधानांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या भुट्टोचा माढा मतदारसंघ व फलटण तालुका भाजपच्या वतीने जाहीर निषेध करत आहे.

बातम्या आणखी आहेत...