आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:‘त्या’ ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचे स्पष्ट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात २ व्यक्तींमधील संभाषण व्हायरल झाले होते. संभाषणातील एक आवाज माजी वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) अहवालात स्पष्ट झाले आहे. याला पुणे पोलिसांनी दुजोरा देत दोन महिन्यांपूर्वीच हा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. आता पुन्हा राठोड यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांना उधाण आले असताना हा अहवाल आल्याने त्यांची गोची झाली आहे.

७ फेब्रुवारी २०२१ ला पूजा चव्हाणने पुण्यात इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. प्रकरणाचा संदर्भ तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी पूजाने मद्यसेवन केल्याचेही फॉरेन्सिक व व्हिसेरा अहवालात निष्पन्न झाले. फॉरेन्सिक अहवाल दोन महिन्यांपूर्वी पूणे पोलिसांना देण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी पूजाच्या आई - वडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचे यापूर्वीच लिहून दिले आहे.

सुरुवातीला १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या
याप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिकदृष्ट्या तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. सुरुवातीला १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरू’ नावाच्या पात्राने प्रवेश केला होता. गबरू आणि पूजाच्या नावाने ऑडिओ रेकॉर्डिंगही व्हायरल झाले होते. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढतच चालले होते.

बातम्या आणखी आहेत...