आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:रिक्षात विसरली होती बॅग, 100 सीसीटीव्ही पाहून पाेलिसांनी शाेधली दागिन्यांची बॅग

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 सीसीटीव्ही पाहून शाेधली दागिन्यांची बॅग

शहरातील एका नगरसेविकेचा मुलगा रिक्षाने प्रवास करत असताना त्याची एका रिक्षात साेन्याचे दागिने असलेली बॅग विसरली. रिक्षाचालक गेल्यानंतर काही वेळाने त्याच्या लक्षात ही बाब आली आणि त्याने पाेलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पाेलिसांनी विविध भागांतील १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत रिक्षाचालकाचा माग काढून रिक्षातून संबंधित पावणेदाेन लाख रुपयांचे दागिने हस्तगत केल्याची यशस्वी कामगिरी स्वारगेट पाेलिसांनी केली आहे.

नगरसेविका कविता वैरागे यांचा मुलगा रविवारी दुपारी स्वारगेट परिसरातून रिक्षाने प्रवास करत हाेता. रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर ताे पुन्हा सदर रिक्षातून घरी आला आणि त्यावेळी त्याच्या जवळील साडेचार ताेळे साेन्याचे दागिने असलेली बॅग चुकून रिक्षातच विसरली. रिक्षाचा क्रमांक अथवा चालकाचा माेबाइल क्रमांक माहिती नसल्याने आता दागिने मिळतील की नाही अशी शंका त्याच्या मनात आली व त्याने स्वारगेट पाेलिस ठाणे गाठून पाेलिसांना याबाबत माहिती दिली.

पाेलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाइकवाडी यांचे पथकाने याबाबत तपास सुरू करत, संबंधित परिसरातील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाची आेळख पटवली आणि सोने मिळवले.