आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत निर्माण करण्यासाठी 10 ते 15 वाहनांची ताेडफाेड:येरवडा भागातील वडारवस्ती येथील धक्कादायक प्रकार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या असल्या तरी अद्याप गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. येरवडा भागातील भगवा झेंडा चौक ते सेवक चौक दरम्यान वडारवस्ती येथे दहशत निर्माण करण्यासाठी एका टोळक्याने सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या 10 ते 15 वाहनांची तोडफोड करुन नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात सहा ते सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

भरत चंद्रकांत वाजणी (वय 48,रा.येरवडा,पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्यानुसार पोलीसांनी आरोपी सिध्देश शेंडगे, तेजस शेंडगे, करण अडागळे, मोईन शेख (सर्व रा.येरवडा,पुणे) व त्यांचे सोबत असणारे दोन ते तीन अनोळखी मुले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भरत वाजाणी हे येरवडा परिसरात लक्ष्मीनगर येथे कुटुंबा समवेत रहाण्यास आहे. 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता सदर भागातच राहणारे आरोपींचे टोळके यांनी संबंधित जागी गैरकायद्याची मंडळी जमा केली.

लाकडी बांबु व दांडक्याने तोडफोड

संबंधित ठिकाणी तक्रारदार यांनी लावलेली त्यांची स्कुलव्हॅनच्या काचेची तसेच इतर उभ्या असलेल्या रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांची विनाकारण लाकडी बांबु व दांडक्याने तोडफोड करुन नुकसान केले आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त येरवडा विभाग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हयाची माहिती घेतली.

4 आरोपी ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी दोन सज्ञान व दोन अल्पवयीन अशा चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती येरवडा पोलीसांनी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. खटके करत आहे.

शस्त्राच्या धाकाने दुचाकी चोरी

दिपक सिताराम पाटील (वय 32,रा.राजगुरुनगर,पुणे) हे पुण्यात कामानिमित्त 31 जानेवारी रोजी आले होते. पुण्यातील काम संपवून ते दुचाकीवर राजगुरु नगरला परतत असताना, पुण्यातील शिवाजीनगर भागात डेंगळे पुलावर थांबुन फोनवर बोलत असताना, दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येऊन त्यांना लोखंडी हुक सारख्या शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील 15 हजार रुपयांची दुचाकी जबरदस्तीने चोरी करुन नेली.

बातम्या आणखी आहेत...