आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक..!:कारखान्यातील हौदात बुडून 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एकेआरसीसी कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिमेंट पाईप बनविणार्‍या कारखान्यात हौदात बुडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना 31 डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास जांभुळवाडीतील एकेआरसीसी कंपनीत घडली. याप्रकरणी संबंधित कारखाना मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

सुरभी विमलकुमार गौतम (वय -दोन वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अश्रफ अली खान (रा -पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वडील विमलकुमार गौतम (वय 26, रा. जांभुळवाडी,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडीत आरोपी अश्रफ अली खाना याच्या मालकीची सिमेंटचे पाईप बनविणारी एकेआरसीसी कंपनी असून त्याठिकाणी विमलकुमार मजुरी करतो. 31 डिसेंबरला तो मुलीसह कामावर गेला होता. त्यावेळी खेळत असताना सुरभी चालत जमिनीवर खोदलेल्या हौदाजवळ गेली. त्याठिकाणी कारखाना मालक अश्रफने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे सुरभी हौदात पडली. बुडाल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी कारखाना मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करीत आहेत.

खुन्नसीतून डोक्यात फरशी मारली

तु काय मोठा भाई झालास का, डोळे फाडून का बघतोय असे म्हणत पुर्ववैमनस्यासह खुन्नसीच्या रागातून तरूणाच्या डोक्यात फरशी मारून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना 31 डिसेंबरला उत्तमनगरमध्ये घडली. याप्रकरणी दोघांना आज पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

कार्तिक शर्मा (वय 21, रा. मासेआळी, उत्तमनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव गणेश धावडे (वय 22) आणि प्रसाद नवनाथ कोळी (वय 22 दोघेही रा. उत्तमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला कार्तिक त्यांच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी आलेल्या गौरव आणि प्रसादने त्याला तु काय मोठा भाई झालास का, आमच्याकडे डोळे फाडून का बघतोय असे म्हणत शिवीगाळ केली. त्याला मारहाण करीत फरशी डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...