आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी द्या अन्यथा गोळ्या झाडू:मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलास मागितले 30 लाख रुपये, अन्यथा जीवे मारण्याची धमकी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत उर्फ तात्या मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह प्रमाणपत्र एका तरुणीने बनवले. त्यानंतर 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जर खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी मोरे यांच्या मुलास देण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याचे बनावट विवाह सर्टिफिकेट अन्फीया शेख या तरुणीच्या नावाने बनवण्यात आले. त्यानंतर ते व्हॉट्सअपवर पाठवून मॅसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली. यात म्हटले होते की, अन्फीया शेख या मुलीसोबत तुमचा विवाह झालेला असून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीचे मॅरेज सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे.

तुमच्या नावाचे विवाह सर्टिफिकेट बनवले असून पुण्यातील खराडी येथील इनोव्हा एमएच 12 क्यु आर 7860 या कारमध्ये 20 लाख रुपये तात्काळ ठेवा, असा व्हॉट्सअपवर मेसेज आला. तसेच, खंडणी दिली नाही तर बनावट विवाह सर्टीफिकेट विविध मोबाईलवरून व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या घालण्याचीही धमकी दिली. त्याचप्रमाणे 30 लाख रुपये न दिल्यास बलात्काराचा गुन्हा देखील आपल्यावर दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.