आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणूकीने भरावयाची एकूण 4 हजार 590 पदे असून 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी बुधवारी दिली आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेल्या 255 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 27 मार्च ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत इच्छूक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे मागवण्यात आली होती. या मुदतीमध्ये 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
एवढी पत्रे प्राप्त
या कार्यक्रमानुसार सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 पदे भरावयाची असून त्यासाठी 19 हजार 518 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 पदे असून 9 हजार 189 नामनिर्देशन पत्रे, व्यापारी,अडते मतदार संघात 510 पदांसाठी 2 हजार 566 नामनिर्देशन पत्र व हमाल,तोलारी मतदार संघामध्ये 255 पदांसाठी 1 हजार 286 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत, असेही प्राधिकरणाने सांगितले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत 82 लाभार्थ्यांना 34 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 2022-23 या वर्षी पुणे जिल्ह्यातील 82 लाभार्थ्यांना लाभ दिला असून 34 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.
25 हजार रुपये मर्यादेत अनुदान
या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन विहीरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख, जुनी विहिर दुरुस्ती 50 हजार, इनवेल बोअरींग व पंपसंचासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये, वीज जोडणी आकार 10 हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी 25 हजार रुपये या मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.