आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:रुग्णालयातून फरार झाली 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला, पकडण्यासाठी गेलेल्या टीमवर केली दगडफेक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
अटकेदरम्यान महिलेने पोलिसांवर दगडफेकही केली.
  • ही कोरोनाबाधित महिला एक आठवड्यापासून मायमर रुग्णालयात दाखल होती
  • हॉस्पिटल स्टाफ आणि स्थानिक पोलिसांनी अवघ्या दीड तासात तिला पकडले

पुणे शहरालगतच्या मावळ भागात गुरुवारी पहाटे एक महिला कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या रुग्णायातून फरार झाली. हॉस्पिटल स्टाफ आणि स्थानिक पोलिसांनी अवघ्या दीड तासात तिला पकडले. अटकेदरम्यान या महिलेने पोलिसांवर दगडफेकही केली. 

पळून गेल्यानंतर ही महिला एका निर्माणाधीन इमारतीत लपली होती.

तळेगाव पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, 45 वर्षीय महिला कोरोना संक्रमित झाल्यापासून एक आठवड्यापासून मायमर रुग्णालयात दाखल होती. आज सकाळी ती गार्ड्सची नजर चुकून रुग्णालयाची सुरक्षा भिंतीवरून उडी मारून पळून गेली. तेथून पळून गेल्यानंतर ही महिला एका निर्माणाधीन इमारतीत लपली होती. माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि डॉक्टरांच्या टीमवर तिने दगडफेक केली. 

या महिलेला ताब्यात घेऊन कोरोना रुग्णालयात परत नेले.

कामशेत भागात राहणारी ही महिला मानसिकरित्या आजारी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तिला रुग्णालयात नेले आहे. दरम्यान ही महिला दोन तास कुठे-कुठे लपली होती याबाबत तपास केला जात आहे. 

0