आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:रियल व्हॅल्यू एंटरप्राईजेस या कंपनीत गुंतवणुकीचे अमिष, 32 जणांना 86 लाखांचा गंडा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रियल व्हॅल्यू एंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला व आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दोन जणांनी दाखवले. त्याकरीता 32 जणांकडून एकूण 86 लाख 75 हजार रुपये घेऊन, सदर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात रोहित गुलाब खिलारी (वय 31, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी पोलिसांकडे आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी निलेश गिरीश जोशी( वय 45, रा. कोथरूड, पुणे )आणि अश्विनी निलेश जोशी (वय 41) यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा तसेच सहकारी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करत, आरोपी निलेश जोशी यासा अटक केली आहे. सदरचा प्रकार मे 2022 पासून आतापर्यंत घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी निलेश जोशी आणि अश्विनी जोशी यांनी तक्रारदार रोहित खिलारे तसेच त्यांचे इतर मित्र व नातेवाईक असे एकूण 32 जणांचा विश्वास संपादन केला. आरोपींच्या रियल व्हॉल्यू इंटरप्राईजेस या नावाने व्यवसाय असून सदरची संस्था एनएसबी, बीएसएफ मध्ये उत्तम प्रकारे उलाढाल करते असे सांगितले..

वार्षिक गुंतवणुकी बाबत चांगला आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या योजना आरोपींनी सांगून सर्वांचे मिळून एकत्रित 86 लाख 75 हजार रुपयांच्या ठेवी स्वीकारून घेतल्या. त्यानंतर कोणत्याही गुंतवणूकदारांना परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत वारजे पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. जवळगी पुढील तपास करत आहेत.