आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यात पाइपलाइन फुटल्याने 9 लोक जखमी झाले आहेत. शहरातील जनता वसाहट भागात ही घटना घडली. पाइपलाइन फुटल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यात अनेक दुचाकी वाहून गेल्या तसेच 35-40 घरात हे पाणी शिरले.
जनता वसाहत गल्ली क्रमांक 29 ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 मिनिटांनी घडली. येथे 18 इंच पाण्याची पाइपलाइन फुटली आणि त्या भागात पूर आला. घटनेवेळी अनेक लोक आपल्या घरात झोपले होते. ही वस्ती डोंगरावर वसली आहे.
उंचावरून पाणी आल्यामुळे झाले नुकसान
या पाइपलाइनद्वारे अर्ध्या पुणे शहरात पाणीपुरवठा केला जातो. टेकडीवरून पाइपलाइन खाली आल्यामुळे त्यावरील पाण्याचा दाब खूप जास्त असतो. या घटनेत महेश मोर, रविंद्र कोंढाळकर, सुनीता बैत, पीयूष जाधव, अक्षय सोलकर यांसह 9 जण जखमी झाले. यापैकी 5 जणांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींना भारती विश्वविद्यालय रुग्णालयात दाखल केले आहे.
पाण्याच्या टाक्या डोंगरावर बांधल्या आहेत
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या डोंगरावर बांधल्या आहेत. पार्वती पाणी प्रकल्पातून हा पुरवठा केला जातो. त्या टाक्या यापूर्वीच भरल्या असून पुणे शहराला त्यांच्या गरजेनुसार पाणीपुरवठा केला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.