आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील सिंहगड राेड परिसरातील हिंगणे चाैकाजवळ अपणा फार्मसी समाेर प्रवाशाची वाट पाहत असलेल्या एका कारचालकाचे पाच आराेपींनी बळजबरीने अपहरण करुन त्यास विवस्त्र करुन त्यास चाेरटयांनी लुटत धमकी देऊन 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आराेपींचा शाेध घेत तीन सराईत गुन्हेगारासह पाचजणांना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
विनाेद शिवाजी जामदारे (वय-32), विशाल विठ्ठल रणदिवे (22), राेहित विलास शिनगार (19), गाैरव गंगाधर शिंदे (25) व नितीन सुरेश जाेगदंड (35,सर्व रा.पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी 40 वर्षीय कारचालकाने आराेपी विराेधात सिंहगड राेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 20 डिसेंबर राेजी दुपारी दीड ते साडेचार वाजण्याचे दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर कार चालक हे त्यांचे ताब्यातील कार घेऊन भाडे घेण्यासाठी जात असताना, सदर ठिकाणी थांबून प्रवाशाची वाट पाहत थांबले हाेते.
त्यावेळी आराेपी हे त्यांचे जवळ येऊन त्यांनी आम्हाला राजाराम पुलाजवळ साेड असे म्हणाल्याने, चालकाने त्यांना मला भाडे लागले आहे, मी प्रवाशाची वाट पाहत आहे असे म्हणाले. त्याचा राग येऊन आराेपींनी चालकाच्या ताेंडावर बुक्की मारुन त्यास त्याचे गाडीत जबरदस्तीने काेंडून ठेऊन सदर गाडीसह आराेपी हिंगणे स्मशानभूमीकडे गेले.
यावेळी इतर आराेपी माेटारसायकलवर त्यांचे पाठीमागुन येऊन सर्वांनी मिळून चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील 2200 रुपये राेख व आठ हजार रुपये किंमतीचा माेबाईल फाेन जबरदस्तीने काढून घेतला.
त्यानंतर त्यांना विवस्त्र करुन त्यांचे गाडीत चालकास घेऊन जावून जीवे मारण्याची धमकी देत 50 हजार रुपयांची मागणी केली.दरम्यान गाडी मधील पेट्रोल संपल्याने आरोपी कात्रज भागात थांबलेले असताना चालकाने स्वतःची सुटका करून पोलिस चौकी गाठत असताना पेट्रोलिंग पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करून पुढील कारवाई सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच,वरिष्ठ पोलिस अधिकारी ही घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी करत आराेपींना सापळा रचून गजाआड केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.