आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune, A Couple's Confusion At The Police Station Was A Type Of Assault On Police Personnel; A Case Was Filed Against Both And Arrested

पुण्यात पोलिस ठाण्यात जोडप्याचा गोंधळ:पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार; दोघांवर गुन्हा दाखल करत अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात रस्त्यावर भांडण करणाऱ्या एका जोडप्याला पोलिस ठाण्यात आणून त्यांची समजूत काढणे एका दांपत्यास महागात पडले आहे. या जोडप्याने पोलिस ठाण्यात गोंधळ घालत मध्यस्थी करणाऱ्या दांपत्यलाच चोपले. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या भांडखोर नवरा बायकोला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

सुनील दनाने आणि नीता सुनील दनाने (रा. कळस, विश्रांतवाडी,पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नवरा बायकोची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अस्मिता सचिन लावंड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील दनाने आणि नीता सुनील दनाने हे दोघे भर रस्त्यावर भांडण करत होते. त्यांची ही भांडणे पाहून नागरिक देखील जमा झाले होते. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याने या दोघा नवरा बायकोला पोलिसांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, त्याची समजूत काढून भांडण सोडवण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. मात्र, दोघांनी त्यांची भांडने ही पोलिस ठण्यातही सुरूच ठेवली. त्यांनी थेट पोलिसांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. निता दनाने यांनी पोलीस अंमलदार कक्षातून अजय रिठे यांना ओढून आणले. तसेच त्यांना मारहाण देखील केली. पोलीस शिपाई खेडकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीता दनाने हिने त्यांना हाताने मारहाण केली. सुनील दनाने याने शिवीगाळ देखील केली. या सर्व गोंधळात सुनील दनाने याने पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या हाताचा अंगठा पिरगाळत त्यांना दुखापत केली. यानंतर पोलीस ठाण्यातील खिडकीच्या काचेवर डोके आपटले. काच फुटल्यावर काचेचा तुकडा हातात घेऊन बाहेर पाळण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर दोघांनी अटक केली. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...