आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune, A Young Man Was Hit By An Ax On The Head By A Tempo Businessman, An Act Of Anger That Caused The Young Man To Fire The Tempo.

पुण्यात टेम्पो व्यावसायिकाकडून तरुणाच्या डाेक्यात कुऱ्हाडीने वार:तरुणामुळे टेम्पो कामावरुन काढल्याचा रागातून कृत्य

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड हद्दीत ट्रॅफीकसाठी भाडयाने एका व्यवसायिकाने टेम्पाे दिला हाेता. परंतु व्यवसायिकाच्या नातेवाईकाने दाेन महिन्यापूर्वी महानगरपालिकेची पावती स्वत:चे नावावर गुगल-पे ने घेतल्याने त्याचा टेम्पाे तिथून सस्पेंड करण्यात आला हाेता.

याचा राग मनात धरुन टेम्पाे चालक व्यवसायिकाने नातेवाईक असलेल्या तरुणाच्या डाेक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली.

नेमके प्रकरण काय?

अभिषण दादू रणदिवे (वय-38,रा.राजेवाडी,पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रविण देवदास जगधने (रा.पुणे) या आराेपी विराेधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 18 डिसेंबर राेजी घडल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. आराेपी प्रविण जगधने हा तक्रारदार अभिषण रणदिवे यांचा भाचा आहे. जगधने याचा पिंपरी चिंचवड हद्दीत ट्रॅफीकसाठी भाडयाने टेम्पाे दिलेला हाेता.

तरुणावर यामुळे होता राग

दाेन महिन्यापूर्वी त्याने महानगरपालिकेची पावती स्वत:चे नावावर गुगल-पे ने घेतल्याने त्याचा टेम्पाे त्याठिकाणाहून सस्पेंड केला हाेता. या घटनेस रणदिवे हे कारणीभुत आहे असा गैरसमज हाेऊन त्याचे मनात रणदिवे यांच्या विषयी राग हाेता. घटनेच्या दिवशी रणदिवे हे त्यांच्या मुलीसह घरात असताना, आराेपीचा टेम्पाे तक्रारदार यांनी काढला असा गैरसमज हाेऊन त्याचा राग मनात धरुन हातात कुऱ्हाड घेवून रणदिवे यांचे पाठीमागुन येवून ‘तुला आता खल्लास करताे’ असे म्हणत आराेपीने त्यांच्या डाेक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यांनतर ‘मी इथला भाई आहे’ असे माेठमाेठयाने ओरडून हातातील कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत पसरवून तक्रारदार यांना गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. लाेणारे करत आहे.

वाढदिवसाचे स्टेटस ठेवताय तर सावधान

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात राहणारा साेमनाथ अशाेक सदाफुले (वय-२२) या तरुणाने त्याचा मित्र काळू घाेलप याचे वाढदिवसाचे स्टेटस ठेवल्याचे कारणावरुन आराेपी फहीम फिराेज शेख (रा,पुणा) याने रविवारी (18 डिसेंबर) शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे कमरेचा काेयता काढून त्याचे डाेक्यात मारत असताना, सदाफुले हा जीव वाचवून पळून जात होता.

यावेळी काेयता सदर तरुणाच्या डाव्या पायाच्या पाेटरीवर लागला. यामुळे गंभीर दुखापत हाेऊन ताे खाली पडला. त्यानंतर आराेपी रिक्षातून उतरुन त्याने हातातील काेयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत पसार झाला आहे. याबाबत मार्केटयार्ड पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...