आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्याेत आणण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या टेम्पाेला कंटेनरची जोरदार धडक बसली. रावेत परिसरात शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. या घटनेत 30 ते 35 शिवप्रेमी तरुण जखमी झाले आहेत. साेमटणे फाटा येथील पवना रुग्णालय, पायाेनियर रुगणालय आणि रावेत येथील खासगी रुग्णालयात जखमी तरुणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बंगळुरु- मुंबई बायपास महामार्गावर रावेत परिसरात मावळ तालुक्यातील शिलाटणे गावचे तरुण शिवज्याेत घेऊन शुक्रवारी सकाळी येत हाेते. त्यावेळी अचानक त्यांच्या टेम्पाेला एका कंटेनर ट्रकने जाेरदार धडक दिली. या अपघातात टेम्पाेतील 30 ते 35 तरुण जखमी झाले आहेत. त्यातील 10 जण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. तर, 20 जणांना साेमटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांची धावपळ
लाेणावळा जवळील शिलाटणे गावचे रहिवासी असलेले हे तरुण शिवजयंतीसाठी मल्हारगडावरुन शिवज्याेत घेऊन गावाकडे निघालेले हाेते. महामार्गावर रावेत परिसरात ते आले असताना, एमएच 48 बीएम 1192 या कंटनेर ट्रकची त्यांच्या टेम्पाेला (एमएच 14 एसएल 4851) यास धडक बसली. त्याचसाेबत टेम्पाेची एका माेटारसायकललही धडक बसली. यात टेम्पाे व दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता स्थानिक नागरिकांची धावपळ उडाली. पाेलिसांना याबाबत माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे सदर महामार्गावर वाहतूकीची काेंडी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.