आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्हा-जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिका:दुचाकी-टेम्पोची धडक, भीषण अपघातात माय-लेकासह तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्हा-जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. काल रात्री उशीरा धामारी येथे झालेल्या अपघातात माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी व मालवाहतूक टेम्पो यांची धडक झाली. खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे असे मृत झालेल्या तिघांची नावे आहेत.

धामारी ता. शिरूर येथील शिक्रापूर पाबळ दरम्यान बेल्हा जेजुरी महामार्गावरुन संकेत डोके हा त्याची आई आणि एका मित्रासह येत होता. त्याच्या जवळ असलेली एमएच 14 एचआर 7073 या दुचाकीने धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असताना शिक्रापूर बाजूने आलेल्या एमएच 14 जियु 6880 या आयशर टेम्पोची त्यांच्या दुचाकीला धडक बसली.

दुचाकीला धडक बसून अपघात

धामारी ता. शिरुर येथील शिक्रापूर पाबळ दरम्यान बेल्हा जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह त्याच्या ताब्यातील एम एच 14 एच आर 7073 या दुचाकीहून धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असताना शिक्रापूर बाजूने आलेल्या एमएच 14 जि यु 6880 या टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला.

पोलिसात तक्रार दाखल

डोक्याला मार लागल्याने तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संपत चंदर डोके यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी आयशर टेम्पो चालक अक्षय बबन साकोरे रा. चांडोली राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...