आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ रिल्सच्या नादात गमावला जीव!:शुटींग काढताना पाय घसरुन धरणात बुडाल्याने मृत्यू

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ रिल्सचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मावळ तालुक्यात करांजविहीरे भामा आसखेड धरणावर पार्टीसाठी गेलेल्या मंद्यधुंद तरुणाने धरणाकाठी सोशल मीडियावर टाकण्यासाठी रिल्स काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्हिडिओ काढत असताना अचानक त्याचा पाय घसरुन धरणात बुडाल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्देवी रित्या मृत्यू झाला आहे. ही घटना ११ मार्चला करांजविहारे धरणकाठी घडली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

दत्ता भारती ( वय -२४ सध्या रा.वराळे मूळ गाव बीड) असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मावळ परिसरातील वराळे गावातील तीन मित्र ११ मार्चला पार्टी करण्यासाठी जवळील करांजविहीरे भामा आसखेड धरणावर गेले होते. त्यावेळी मंद्यधुंद अवस्थेत असलेल्या दत्ताने धरणाच्या काठावर उभे राहून व्हिडिओ रिल्स शूट करण्याचा मित्रांसोबत प्रयत्न केला. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे तो बुडू लागला. त्याला पोहता येत नसल्याने बुडू लागल्यामुळे त्याच्या दोघा मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, मदतीसाठी वेळी कोणीच न आल्यामुळे दत्ताचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, महाळुंगे एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर शवविचछेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला.

टोळक्याचा राडा, मोटारीच्या काचा फोडल्या

नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी टोळक्याने मोटारीच्या काचा फोडल्याची घटना ११ मार्चला रात्री एकच्या सुमारास शिवणेतील देशमुखवाडीत घडली. याप्रकरणी एका आरोपीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे.अभिजीत भीमाशंकर देशमाने (वय २३ रा. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करण देशमुख (वय २८ रा. शिवणे ) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण हे ११ मार्चला रात्री एकच्या सुमारास मोटारीतून घरी निघाले होते. त्यावेळी देशमुखवाडीत चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. दहशत माजविण्यासाठी टोळक्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. आरोपींनी हातात बांबू, रॉड घेउन धुडगूस घातला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...