आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव मोटारीच्या धडकेत निवृत्त नाैदल अधिकाऱ्याचा मृत्यू:येरवाडा ते शास्त्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील येरवडा परिसरात एका भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत माजी नाैदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. प्रकाशचंद्र लक्ष्मणराव तेलंग (वय 73, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे ठार झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे.

याप्रकरणी प्रज्ञा तेलंग (वय 33) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे. हा अपघात पाच फेब्रुवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास शास्त्रीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रज्ञा तेलगं यांचे सासरे प्रकाशचंद्र तेलंग हे रविवारी सकाळी सव्वा दहा वाजण्च्या सुमारास शास्त्रीनगर परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगातील मोटार चालकाने त्यांना जबर ठोस दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने प्रकाशचंद्र तेलगं यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पाेलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करीत आहेत.

महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

काेथरुड परिसरात मुलीची वाट पाहत थांबलेल्या एका पादचारी महिलेजवळ येऊन अनाेळखी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 90 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास काेथरुड भागातील इंपेरियल गोल्ड इमारतीजवळ मुलीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने अचानक त्यांच्या गळ्यातील 1 लाख 90 हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे दुचाकीवर पसार झाले. या प्रकरणी दाेन अनाेळखी चाेरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...