आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या नवीन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात येत असून त्याचा वापर संशोधन आणि विकास कामात केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान हे लष्करी युद्धात कामी येते. तंत्रज्ञानचे हे युग असून त्यापासून कोणता देश अलिप्त राहू शकत नाही. असे मत भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बुधवारी व्यक्त केले.
मनोज पांडे पुढे म्हणाले, संशोधनामध्ये गुंतवणूक करणे आणि आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आपण विविध क्षेत्रात काम करत आहे. लष्करात ही संशोधनास प्रोत्साहन दिले जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान अशाप्रकारच्या विषयात आपण प्रगती करत आहे.
यांचा जीवनगौरवने सन्मान
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अर्चना मनोज पांडे, प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल टी.एस. बैनस, मेजर जनरल आर के रैना, एआयटीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट उपस्थित होते. यावेळी उद्योजक बाबा कल्याणी यांना एआयटीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
शाश्वत विकास
जनरल मनोज पांडे म्हणाले, आपल्या राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान नवकल्पना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. भारत आणि जगभरातील आव्हाने आणि संधींबद्दल बोलताना ते म्हणाले, शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी व्यावहारिक आणि अंमलबजावणी योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबन हे राष्ट्राच्या प्रवासात महत्त्वाचे आहे.
कल्याणी यांची प्रमुख भूमिका
कल्याणी ग्रुपने अलीकडेच त्यांच्या एटीएजीएस तोफांसाठी $155 निर्यात करार मिळवला आहे. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत तोफखाना निर्मिती सुविधाही ते उभारत आहेत, या सर्वात कल्याणी यांची प्रमुख भूमिका आहे.
सशक्त भारत योजना
कल्याणी म्हणाले, हा पुरस्कार मला मिळाल्याने मी संस्थेचा आभारी आहे. माझे सहकारी, कुटुंब आणि हितचिंतक यांच्या वतीने मी पुरस्कार स्वीकारात आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत आम्ही लष्करी उत्पादने बनवली असून नुकतेच पोखरण येथे त्याची चाचणी घेण्यात आली. परदेशातील प्रतिनीधी यांनी ही शस्त्रांच्या गुणवत्तेची आणि क्षमतेची प्रशंसा केली आहे. मेक इन इंडिया आणि सशक्त भारत योजना अंमलबजवणी 25 वर्ष उशिराने होत आहे.
महागाई मर्यादित
भारत हा लष्करी शस्त्रे अनेक वर्ष आयात करत होता परंतु पंतप्रधान यांच्या पुढाकाराने भारत आता शस्त्रे निर्यातदार बनत आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. उद्योगांना पोषक पायाभूत सुविधांच्या निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. जगाच्या तुलनेत महागाई आपण मर्यादित ठेवली आहे. 'भारत प्रथम' अंतर्गत जगातील देश भारताकडे आशेने पाहत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.