आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे शहरात गुटखा विक्रेत्यांविराेधात पाेलिसांची आक्रमक भूमिका:विविध ठिकाणी छापेमारी करुन 25 गुन्हे दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुटखा विक्रीस बंदी असतानाही शहराचे विविध भागात खुलेआम गुटखा विक्री सुरु असल्याचे निर्देशनास येत आहे. त्यामुळे पुणे पाेलिसांनी गुटखा विक्रेत्या विराेधात आक्रमक भूमिका घेत विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अचानक छापेमारी करत एकाच दिवशी 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पाेलिसांनी शुक्रवारी दिली.

हडपसर, लाेणीकाळभाेर, मुंढवा, विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ, चंदननगर, चतुश्रृंगी, सिंहगड राेड, काेथरुड, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, डेक्कन, समर्थ, सहकारनगर आदी पाेलिस ठाण्याचे अंर्तगत सदरची कारवाई करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

घाेरपडीगाव येथे कारवाई

हडपसर पाेलिस ठाण्याचे हद्तीत केशवनगर येथे एका टपरीवर पाेलिसांनी कारवाई करुन दहा हजार 800 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी संताेष दत्तात्र्य थेृरकर (वय 52) यास अटक करण्यात आली. मुंढवा पाेलिस ठाणे हद्दीत घाेरपडीगाव येथे एका दुकानावर कारवाई करुन दहा हजार 900 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संताेष शंकर इंगवले (44) यास अटक करण्यात आली.

प्रतिबंधक आदेशाचा भंग

टिंगरेनगर मध्ये अशाचप्रकारे शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनाने आराेग्यास घातक तसेच मुखाच्या कर्कराेग व इतर विकार हाेवुन शारिरिक हानी हाेते हे माहिती असताना शासनाचे प्रतिबंधक आदेशाचा भंग करुन कबीर अब्बास (वय 28) या टपरी चालकाने दहा हजार रुपयांचा गुटखा विक्री ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकरीवर कारवाई

तर,येरवडातील शास्त्रीनगर मध्ये अब्दुल रेहमान माेहम्मद मेकर्ला (वय 45) याच्याकडून पाेलीसांनी दहा हजार रुपयांचे सिगारेट व गुटखा जप्त केला आहे. विमानतळ पाेलिस ठाण्याचे हद्दीत लाेहगाव मधील जय भाेले पान शाॅपवर कारवाई करत पाेलीसांनी दहा हजार 782 रुपयांचा पानमसाला जप्त करत टपरी मालक मुकेश गुप्ता (वय 34) याच्यावर गुन्हा दाखल केला. चतुश्रृंगी पाेलिसांनी पाषाण भागात एका बेकरीवर कारवाई करुन तिथे विक्रीसाठी ठेवलेला सुमारे 25 हजारांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...