आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्याजवळील पिंपरी चिंचवडजवळ वाकड येथे 26 वर्षीय एअरहोस्टेसवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पीडित आणि आरोपीची मैत्री ऑनलाइन डेटिंग साइट 'टिंडर' च्या माध्यमातून होती. आरोपीने एअरहोस्टेसला हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बोलावले, प्रथम तिला दारू पिण्यास भाग पाडले आणि त्यानंतर आपल्या जाऊन घरी तिच्यावर बलात्कार केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याने पीडितेने कठोर मारहाणही केली. पीडित मुलीवर अद्यापही पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर म्हणाले, पीडित मुलीच्या वडिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील आरोपी अभिजीत वाघ याला अटक करण्यात आली आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीने स्वत: लाही जखमी केले
विवेक मुळीकर म्हणाले, 'आरोपीनी शनिवारी एका महिलेला हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बोलावले आणि तिला दारू पिण्यास भाग पाडले. यानंतर घरी नेऊन तिला मारहाण केली आणि बलात्कार केला. गुन्हा केल्यावर आरोपीने प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी स्वत:वर चाकूने वार केले. शेजार्यांनी त्याला जखमी परिस्थितीत रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून सुट्टी मिळताच आम्ही त्याला ताब्यात घेऊ.'
शेजार्यांनी वाचवला महिलेचा जीव
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की हॉटेल सोडल्यानंतर ती बेशुद्ध परिस्थितीत त्याच्या घरी पोहोचली. तो तिला सतत मारहाण करत अत्याचार होता. तिने त्याला विरोध केला तरीही तो थांबला नाही. जखमी महिलेने मदतीसाठी आक्रोश केल्यानंतर शेजारचे काही लोक घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेचा जीव वाचवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.