आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी रुळावर:लोहगाव विमानतळावर कोरोनानंतर प्रथमच महिनाभरातच साडेसहा लाख प्रवाशांचे उड्डाण

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहगाव विमानतळावर कोरोनानंतर प्रथमच सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली आहे. यात एकट्या मे मध्ये 6 लाख 69 हजार प्रवाशांनी उड्डाण केले. केंद्र सरकारने विमान वाहतुकीचे नियम ऑक्‍टोबर 2021 पासून टप्प्याटप्प्याने शिथिल केले. यामुळे लोहगाव विमानतळावरून विमानांची उड्डाणांची संख्या वाढत गेली. सध्या येथून दररोज सरासरी 160 विमाने टेकऑफ आणि तेवढीच विमाने लँडिंग करतात.

180 ते 200 विमानांचे उड्डाण

लोहगाव विमानतळावर विमानातून सरासरी 22 हजार प्रवासी असतात. कोरोनापूर्वी येथून दिवसाला 180 ते 200 विमानांचे उड्डाण होत असते. त्याद्वारे सुमारे 25 हजार प्रवासी ये-जा करायचे. कोरोना काळात यात घट झाली होती. पण जानेवारी 2022 पासून प्रवाशांच्या संख्येत वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात करोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून विमानांचे उड्डाण सुरू होते. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधाचे नियम शिथिल केल्याने प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागली. त्यामुळे मे मध्ये हा आकडा पावणेसात लाखांच्या घरात गेला आहे.

महिना प्रवासी संख्या

- जानेवारी - 3,28,357

- फेब्रुवारी - 3,82,085

- मार्च - 5,59,396

- एप्रिल - 5,03,606

- मे - 6,69,464

बातम्या आणखी आहेत...