आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Ajit Pawar Corona Updates : Injections On Mucormycosis Should Be Supplied As Needed, State Government's Statement To The Center

पवारांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा:गरजेनुसार म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, राज्याचे केंद्राला निवेदन; अजित पवारांनी दिली माहिती

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातल्या येरवड्यातही लहान मुलांसाठीचे 100 बेड्स कोविड सेंटर आजपासून सुरु

राज्यातील कोरोनाचा विळखा सातत्याने वाढतच आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या पुण्यात म्युकरमायकोसिसचे 300 रुग्ण आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक दिवशी रुग्णाला जवळपास 6 इंजेक्शन द्यावी लागत आहेत. ​​​​म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सर्व पुरवठा केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार इंजेक्शनचा पुरवठा करणे शक्य नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. केंद्राकडून राज्याला पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गरजेनुसार म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, असे निवेदन राज्य सरकारने केंद्र सरकारला दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार तिसऱ्या लाटेशी लढण्यास सक्षम असून लहान मुलांसाठी कोविड सेंटर्स उभारण्यातं काम सुरु आहे. कारण तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनी कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पुण्यातल्या येरवड्यातही लहान मुलांसाठीचे 100 बेड्स कोविड सेंटर आजपासून सुरु झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर लसींच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे सुरु आहे. पुणे, मुंबई महानगरपालिकांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...