आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातही ती असुरक्षित:पुण्यात 11 वर्षीय मुलीवर वडील आणि भावाकडून अनेकदा अत्याचार, मामा आणि आजोबाने केला विनयभंग

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील 11 वर्षीय मुलीवर वडील आणि भावाकडून अनेकदा अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याशिवाय आजोबा आणि मामाकडूनही या मुलीचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तब्बल 6 वर्षापासून वडील आणि भाऊ अत्याचार करीत असल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आल्याने या नात्यांनाच काळीमा फासला गेला आहे.

पीडित मुलीचे आजोबा आणि तिचा चुलत मामा यांच्याकडूनही अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. यात संशयित आरोपी असलेल्या भावाला अटक करण्यात आली. इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलीच्या मनावर आघात झाला आहे. आघातातून बाहेर येण्यासाठी तिला समुपदेशन दिले जाणार असल्याची माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली आहे.

14 वर्षीय मुलीवरही वडीलांकडून अत्याचार

पुण्यात अत्याचाराच्या घटना रोज वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील हडपसर भागात एका 14 वर्षीय मुलीवर बापाने अत्याचार केला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मुलीच्या वडीलांना अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने मुलगी घरात झोपली असताना तिला किचनमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला होता. आईला याबद्दल काही सांगायचे नाही, नाही तर मारून टाकेल अशी धमकी देखील मुलीला त्याने दिली होती.

तर दुसर्‍या दिवशी मुलीच्या आईला घराबाहेर हाकलून देत, पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलीच्या आईला 1 आणि 2 मार्च रोजी मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती समजताच तिने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...