आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दोन चिमुकल्यांच्या आत्महत्या:पुण्यात मटण हातातून निसटल्याने वडील रागावले, 10 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या; मुंबईतील चिमुकल्यानेही उचलले टोकाचे पाऊल

मुंबई/पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांनी रागावल्यानंतर आत्महत्या करणारा पुण्यातील मुलगा व्यंकटेश
  • पुण्यात वडिलांनी रागावल्यानंतर तर मुंबईत आईने मोबाईल हिसकावल्याने आत्महत्या

राज्यातील दोन प्रमुख महानगर मुंबई आणि पुण्यात दोन लहान मुलांनी फासावर लटकून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील एका घटनेत पुण्यामध्ये वडिलांनी 10 वर्षांच्या मुलाच्या हातातून मटण निसटून पडल्याने त्याला रागावले. याचा मुलाला इतका राग आला की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासोबतच, मुंबईत एका 12 वर्षांच्या मुलाने आईने मोबाईल माझ्याकडून घेतलाच कसा या रागात टोकाचे पाऊल उचलले आहे.

पुण्यातील मुलाने बाथरुममध्ये घेतला गळफास

पुण्यातील चिखली परिसरात 10 वर्षीय मुलाने आपल्या घरातील बाथरुमच्या ग्रिलवर गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यंकटेश लक्ष्मण पुरी नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसह श्रीकुंज हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता. त्याचे आई-वडील मंगळवारी काही कामानिमित्त घराबाहेर असताना त्याने गळफास घेतला. व्यंकटेश चौथीमध्ये शिकत होता. त्याचे वडील ऑटो रिक्शा चालवतात. तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडीची कामे करते. दोघे घरी परतले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

मुंबईत आईच्या पदराचा गळफास तयार करून उचलले टोकाचे पाऊल

मुंबईतील शिवाजीनगर परिसरात राहणारा 12 वर्षीय मोहंमद अली खान मोबाईलवर गेम खेळत होता. दिवसरात्र आपला मुलगा मोबाईलवरच असल्याचे पाहून आई निलोफरने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. तसेच अभ्यास कर म्हणून रागावली सुद्धा. यावर मुलगा इतका संतापला की थेट घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि आईच्याच पदराचा गळफास तयार केला. त्यावरच लटकून मुलाने आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुंबई पोलिसांनी यात आई-वडिलांची काहीच चूक नसल्याचे म्हटले आहे.