आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंदीमध्ये धर्म परिवर्तनाचा प्रयत्न:'स्वत:चा धर्म सोडा आणि येशूची पूजा करा'; रक्त म्हणून पाजले द्राक्षाचे पाणी, गुन्हा दाखल

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आळंदीमध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरील प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा असं सांगत तुम्ही येशूचे रक्त प्या पूजा करा, असं करायला सांगितल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत उद्धव नागनाथ कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी ( वय 65, रा. धानोरी, पुणे) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातामध्ये एक ताट असून त्यात लाल रंगाचं पाणी असलेले ग्लासही दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचं पाणी आहे. ते येशूचं रक्त म्हणून दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे घटना

आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपी सुधाकर सूर्यवंशी याच्यावर दोन्ही पोलिस ठाण्यात 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मात द्वेष निर्माण करून जातीय तेढ केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुधाकर सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह झोपडपट्टी परिसरात “ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो. तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. तसेच हिंदू धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा” असा आग्रह करत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आहे. व्हिडिओ दिसणारी मेरीनाथन या महिलेलाही पोलिसांनी शोधून काढले असून तिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सूर्यवंशी याचाही पोलिस शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...