आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी युध्दसराव सहभाग:भारत आणि आ​​​​​​​फ्रिकन देशांच्या लष्कर प्रमुखांची प्रथमच पुण्यात परिषद

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि आफ्रिकी देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद पुण्यात 28 मार्च रोजी पुण्यात आयोजित केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर भारत आणि आफ्रिकी देश यांच्यात संयुक्त लष्करी सराव पुण्यात 21 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे.

यामध्ये 24 आफ्रिकी देशांच्या तुकडया आणि निरीक्षक यात सहभागी होणार असल्याची माहिती ब्रिगेडियर जेम्स थॉमस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नल माेहित ग्राेवर उपस्थित हाेते.

ब्रिगेडिअर थाॅमस म्हणाले, आफ्रिका व भारत संयुक्त लष्करी सरावास ‘ओबँट अभ्यास’ असे नाव देण्यात आले आहे. भूसुरुंग निकामी करणे आणि शांतात प्रस्थापित करणे हा या संयुक्त सरावाचा उद्देश्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुसार शांतता राखण्यासाठी आयाेजित संयुक्त माेहिमेत सामारिक काैशल्ये, कवायती व कार्यपध्दती सक्षम करणे, आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्यांशी समन्वय व भारत आणि आफ्रिकी देशांच्या संरक्षण दलात सहकार्य वाढावे हा या संयुक्त सरावाचा मुख्य उद्देश्य आहे.

या आधी झालेल्या भारत आफ्रिका संयुक्त युद्ध सरावात २० देश सहभागी झाले होते. आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत संरक्षण सामुग्री प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार असून आफ्रिकी देश संरक्षण उत्पादनांसाठी बाजारपेठ म्हणून लक्ष्य करण्याचा उद्देश्य या प्रदर्शनाचा आहे. त्याचप्रमाणे भारतीय संरक्षण उद्याेगांना याद्वारे प्राेत्साहन मिळेल. दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात 21 मार्च राेजी औंध मिलिट्री स्टेशन येथे हाेणार आहे. संरक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या परिषदेत भारत -आफ्रिका संरक्षण भागीदारी व भारत संरक्षण उद्याेग संभाव्यता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी याेगदान या विषयावरील चर्चा केली जाणार आहे.

जागतिक परिस्थिती व नवीन सुरक्षा आव्हाने या पार्श्वभूमीवर या परिषदेमुळे सर्व सहभागी राष्ट्रांना या आव्हानांना सामेरे जाण्यासाठी एकत्र येण्याची संधी मिळेल. ज्यामुळे प्रादेशिक सहकार्य वाढेल. सहभागी राष्ट्रांना भारतीय संरक्षण उद्याेग आणि ‘मेक इन इंडिया व ‘आत्मनिर्भर भारत’ सारख्या विविध याेजनेच्या अंर्तगत चालू असलेल्या उपक्रमा विषयी देखील माहिती मिळणार आहे. सदर परिषदे दरम्यान विविध संरक्षण उत्पादन, उद्याेगांना व शैक्षणिक संकुलांना अाफ्रिकन प्रतिनिधी भेट देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...