आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक दहशतवादी जेरबंद:पुणे एटीएसची जम्मू-काश्मिरात कारवाई, आतापर्यंत लष्कर-ए-तोयबाचे चारजण अटकेत

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटीएस युसूफला पुणे न्यायालयात आज सादर करण्याची शक्यता आहे. - Divya Marathi
एटीएस युसूफला पुणे न्यायालयात आज सादर करण्याची शक्यता आहे.

दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणाऱ्या लष्कर-ए- तोयबाच्या संशयिताला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातून युसूफ या संशयिताला एटीएस पथकाने अटक केली.

तरुणांना हेरून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये समाविष्ट करणा-या जुनैदला पुणे एटीएस पथकाने यापूर्वी अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी पुणे एटीएसने लष्कर-ए-तोयबा आणि जुनैदच्या संपर्कात असलेल्या इनामुल या तरुणाला अटक केली. इनामुल हा जुनैदप्रमाणेच तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी चिथावणी द्यायचा, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आता युसूफ याला जम्मू काश्मिरातून पुणे दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. युसूफ हा दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना पैसे पुरवायचा, असे एटीएसच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. एटीएस युसूफला पुणे न्यायालयात आज सादर करण्याची शक्यता आहे. पुणे एटीस पथकाने आतापर्यंत लष्कर ए तोयबाच्या संपर्कात आलेल्या चार जणांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...