आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:​​​​​​​बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी करून 32 कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वडगाव शेरी येथील सर्वे नंबर 32 या ठिकाणची बाजार भाव 32 कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी करून, तिचा वापर करत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका आरोपीवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

अनिल दत्तात्रय भालेकर (वय- 44, रा.ज्योतिबा नगर, पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मनीष धरमपाल दाहिया (वय - 39 ,रा. दिल्ली) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार 11.2.2022 ते आजपर्यंत घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनीष दहिया हे भारत हॉटेल कंपनी ,नवी दिल्ली या कंपनीत सिक्युरिटी मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या मालकीची वडगाव शेरी येथे सर्वे नंबर 32 या ठिकाणी मालमत्तेची फसवणूक करून विक्री करण्याकरीता, आरोपी अनिल भालेकर यांनी कंपनीचे सेक्रेटरी मयत विजयकुमार वर्मा व अरविंद सचदेव हे मयत असताना त्यांचे नाव वापरून, 11.2.2022 रोजीचे कंपनीच्या नावाचे बनावट लेटरहेडवर माहिती, शिक्का व सही बनावट केली बोर्ड ऑफ रेसुलेशन बनवून त्याचा वापर करून मयत विनयकुमार वर्मा हे मयत असताना, त्यांच्या जागेवर बनावट व्यक्ती उभा करून बनावट आधार कार्ड, कंपनीचे बनावट पॅन कार्ड बनवून त्याचा वापर करून बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी आरोपीने स्वतःच्या नावावर करून घेतली.

त्यानंतर प्रॉपर्टीची विक्री करण्याच्या उद्देशाने व कंपनीची अंदाजे 32 कोटी रुपयांची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी तयार केली आहे. तिचा वापर करून सदर मालमत्तेची विक्री करण्याचा प्रयत्न आरोपी करत असल्याने सदर आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम आळेकर याबाबत पुढील तपास करत आहेत.