आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी निदर्शने केली.
विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने दादांवर शाईहल्ला केला. दादांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या सुत्रधारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निषेध नोंदवला.
विश्वासघाताने आणि संधी साधूपणामुळे राज्यात आलेली सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. राज्यातील शांततेचे वातावरण बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मर्यादेत राहून काम करणार आहे.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,आमदार भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवारांचा पुणे बंदला पाठिंबा
राज्यपाल यांच्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य बाबत १३ डिसेंबर रोजी पुणे बंद संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पुणे बंद कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे बंदला पाठिंबा दर्शविला सदर बैठकीस पक्षाचे पुणे शहर , पिंपरी चिंचवड़ व पुणे जिल्हयातील सर्व आमदार ,नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .
सदर बंदमध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून हा बंद शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाही मार्गाने पार पडावा अशी अपेक्षा ही सर्व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.