आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमपीएससी परीक्षेत यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. एमपीएससी क्रॅक नाही झाली तरी आमदार-खासदार होता येते असा अजब सल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या सत्कारासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पडळकर यांनी हे विधान केले. निवडणुकीत पडल्यावर एखाद्या आमदार-खासदाराने आत्महत्या केल्याचे तुम्ही ऐकलेय का? असेही पडळकर यावेळी म्हणाले.
पडळकरांचे विधान
स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. एमपीएससी नाही झाली तरी आमदार-खासदार होता येते. एमपीएससी नाही झालात तरी गावाकडे सरपंच, पंचायत समितीची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. चिंता करू नका, सभापती, झेडपी मेंबर, आमदार खासदार तुम्हाला होता येईल. सगळे म्हणतात एमपीएससीत मोठी स्पर्धा आहे. पण त्यापेक्षा मोठी स्पर्धा निवडणुकीत आहे. 12 कोटी लोकांतून 288 आमदार विधानसभेत आहे. ही स्पर्धा किती मोठी आहे असेही पडळकर म्हणाले.
निवडणुकीत पडल्यावर एखाद्या माजी आमदाराने आत्महत्या केल्याचे तुम्ही कधी ऐकले का? मंत्रीपदाच्या यादीत नाव आलं नाही म्हणून आमदाराने आत्महत्या केल्याचे कधी ऐकले का? ते निराश झाले नसतील का? असेही पडळकर म्हणाले.
विद्या चव्हाणांची टीका
दरम्यान, पडळकर यांच्यावर आता या विधानावरून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांना डोक्याचा भाग नसल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.