आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपरी चिंचवड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. दिघी येथील वामुखवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मुलांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात देशी बनावटीचा बॉम्ब सापडला, जो त्यांनी बॉल समजला आणि त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. यामध्ये बॉम्बचा स्फोट होऊन एका मुलीच्या जागेवरच चिंधड्या उडाल्या. दोन्ही जखमी मुलांची प्रकृती गंभीर आहे.
राजस्थानातून उदरनिर्वाहासाठी आलेय मुलीचे कुटुंबीय
राजस्थानातून उदरनिर्वाहासाठी आलेले कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून दिघी परिसरातील शेतात तंबू टाकून राहत होते. शनिवारी सकाळी त्यांची मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बॉलसदृश वस्तू आणून एका शेडखाली खेळत होती. यामध्ये बॉलचा स्फोट होऊन राधा नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला असता अर्धा डझन देशी बनावटीचे बॉम्ब सापडले. हे देशी बॉम्ब कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आले होते.
देशी बॉम्ब लपवणाऱ्यांचा शोध सुरू
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब दूध विकून आपला उदरनिर्वाह करतात. जखमी मुलांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बॉम्ब इथे कोणी आणि का लपवला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॉम्बचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.