आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन प्रेयसीला १६ वर्षीय मुलाने मारहाण केल्याच्या रागातून प्रियकर व त्याच्या साथीदारांनी मिळून संबंधित मुलाचे अपहरण करुन त्यास बेदम मारहाण करत त्याच्या साेबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पाेलीस ठाण्यात पाच आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी बुधवारी दिली आहे.
याबाबत १६ वर्षीय पीडित मुलाने आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाेलीसांनी यश चव्हाण (वय- १९, रा. मुंढवा,पुणे) याच्यासह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. ही घटना सात मार्च राेजी मुंढवा चाैकाजवळील शेल पेट्राेल पंपाच्या मागे असणाऱ्या माेकळ्या जागेत घडली आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आराेपी व तक्रारदार मुलगा हे एकमेकांचे ओळखीचे आहे. आराेपींनी घटनेच्या दिवशी मुलास माेटारसायकलवर बसवून संबंधित ठिकाणी घेवून जाऊन १६ वर्षीय एका आराेपीच्या प्रेयेसीला पीडित मुलाने मारले. या रागातून त्यास मारहाण केली. त्यानंतर एका आराेपींच्या सांगण्यावरुन दाेन आराेपींनी अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याबाबतची माहिती पाेलीसांना दिल्यास, तुला खल्लास करुन टाकील अशी धमकी आराेपींनी दिली हाेती. याबाबत चंदननगर पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस खांडेकर पुढील तपास करत आहे.
ऑफीसच्या वादातून तरुणाचे नाक फ्रॅक्चर
वडगावशेरी येथील न्याती टेकपार्क इनाेव्हेटीव्ह टेक सर्व्हिस इमारतीत काम करत असलेला अथर्व श्रीपाद कुलकर्णी (वय-२२,रा.शुक्रवार पेठ,पुणे) हा तरुण पार्किंग मधून त्याची दुचाकी काढत हाेता. त्यावेळी त्याचे ऑफीस मधील साैरभ यशवीरसिंह यादव (वय-२५,रा.वडगाव शेरी,पुणे) हा त्याठिकाणी येऊन त्याने माझ्या बद्दल ऑफिस मध्ये चुकीचे स्टेटमेंट तु दिले, त्यामुळे ऑफीसचे मेलवर माफी माग असे सांगितले.
परंतु त्यास अथर्व याने नकार दिला असता साैरभने त्यास शिवीगाळ करुन नाकावर जाेरात फाईट मारुन त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर केले आहे. याबाबत येरवडा पाेलीस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.