आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाखांची लाच घेताना शिक्षक जेरबंद:पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी लघु पाटबंधारे विभागातील एका अभियंत्याने केली. अडीच लाखांची रक्कम एका शिक्षकाच्या माध्यमातून बारामतीतील जळाेची रस्ता येथे स्विकारली जात असताना, संबंधित दाेघे आराेपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळयात अडकले गेले आहेत.

अभियंता संदीप गाेंजारी व त्याचा साथीदार शिक्षक प्रकाश सुर्यवंशी (वय-40) असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. याप्रकरणी बारामती पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात ​​​​​आली आहे.

सापळा रचून रंगेहात पकडले

एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा माेबदला म्हणून, लघु पाटबंधारे खात्यातील अभियंता संदीप गाेंजारी याने अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली हाेती.

तक्रारदाराला आराेपीस पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करून दाद मागितली. एसीबीच्या पथकाने माहितीची खातरजमा करुन सापळा रचून शिक्षकास अटक केली आहे. अभियंता गाेजारी याचे वतीने लाच घेण्यास आलेला शिक्षक प्रकाश सुर्यवंशी रंगेहाथ पैसे घेताना एसीबीच्या पथकास आढळून आला.

ही कारवाई पुणे विभाग एसीबीचे पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे , अप्पर पाेलिस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक राम शिंदे, विरनाथ माने, कर्मचारी प्रविण तावरे, साैरभ महाशब्दे, अभिजीत राऊत यांचे पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...