आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना लॉकडाऊनमुळे पुण्यात रेस्तरॉमध्ये जास्त गर्दी नाही. जास्तीत जास्त लोक ऑनलाइन ऑर्डर करुन जेवण मागवत आहेत. मग आता ग्राहकांना रेस्तरॉमध्ये बोलवावे यासाठी पुण्याच्या रेस्तरॉ अनोखी शक्कल लढवली आहे. रेस्तरॉने एक चॅलेंज सुरू केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने येथील जंबो थाळी 60 मिनिटात पूर्णपणे संपवली तर 1.6 लाखांची रॉयल इनफिल्ड बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येईल.
हा उपक्रम सुरू करणाऱ्या शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर यांनी सांगितले की, 'ग्राहकांच्या कमीमुळे रेस्तरॉचा खर्च आणि स्टाफचा खर्च निघणेही कठीण झाले होते. अशा वेळी आम्हाला ही कल्पना सुचली. जे कुणी व्यक्ती या भल्यामोठ्या ताटात वाढलेले पूर्ण जेवण एकटे संपवेल त्याला आम्ही नवी कोरी बुले गिफ्ट करणार आहोत. यासाठी 60 मिनिटांचा वेळ ठरवण्यात आला आहे.'
60 लोकांनी ट्राय केली ही थाळी, एकाला मिळाले यश
अतुल वायकर यांनी सांगितले की, 'सोशल मीडियावर 'बुलेट थाली'ची चर्चा झाली तेव्हा फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरांमधूनही लोक येथे येत आहेत. 20 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या कांटेस्टमध्ये आतापर्यंत 60 लोकांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र केवळ 1 जणाला सोमवारी यश मिळाले. ही थाळी संपवणाऱ्या सोलापुरच्या सोमनाथ पवार यांना आम्ही बुलेट गिफ्ट केली आहे.
एका थाळीची किंमत अडीच हजार
अतुल यांनी सांगितले, 'या कॉटेस्टमुळे आता रेस्तरॉमध्ये पुन्हा गर्दी झाली आहे. एका थाळीची किंमत अडीच हजार आहे. सामान्यतः चार लोक ही थाळी सहज संपवू शकतात.' जेवण वाया जात नाही का, या प्रश्नावर अतुल यांनी सांगितले की, ही थाळी जो ट्राय करतो, जर तो पूर्णपणे खाऊ शकला नाही तर आम्ही त्यातले जेवण पार्सल करतो.
एका थाळीत 12 व्यंजन, ज्याचे वजन 4 किलो
शिवराज हॉटेलमध्ये लोकांना बक्षीसांविषयी माहिती देण्यासाठी पाच नवीन रॉयल इनफील्ड उभ्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच मेन्यू कार्ड आणि पोस्टरमध्येही याविषयी माहिती देण्यात आली आहे. या बुलेट थाळीमध्ये लोकांना नॉनव्हेज व्यंजन मिळतात. यामध्ये एकूण 12 पदार्थ असतात. ज्यांचे वजन 4 किलो असते. हे तयार करण्यात 55 लोक काम करतात. यामध्ये फ्राय सुराई, फ्राय फिश, चिकन तंदूरी, ड्राय मटन, सूखा मटन, चिकन मसाला आणि प्रॉन बिर्यानीचा समावेश आहे.
यापूर्वीही हॉटेलने दिल्या आहेत आकर्षक ऑफर
ही हॉटेल 8 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. यामध्ये यापूर्वीही अनेक आकर्षक ऑफर देण्यात आल्या होत्या. यापूर्वी रावण थाळी आणली होती. यामध्ये 8 व्यंजन होते. ती 60 मिनिटात संपवणाऱ्याला 5000 हजार रुपये कॅश दिले जात होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.