आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बसमधील चोरी प्रकरणे वाढली:बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची लुटमार, चोरीच्या दोन घटनांमुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना पुणे शहरात मागील काही दिवसापासून वाढत असतानाच आता, पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी प्रवशाना लुटमारीसाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवाजीनगर परिसरात मागील दोन दिवसांत बस मधील चोरीच्या दोन घटनांमुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कात्रज ते शिवाजीनगर या दरम्यान बसप्रवास करणार्‍या तरुणाच्या खिशातील 50 हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना सोमवारी (१३ मार्च) सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुनील मोहिते (वय -३२ रा. आंबेगाव खुर्द ,पुणे ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तर दुसरीकडे, पुणे महानगरपालिका भवन ते आकुर्डी असा बसप्रवास करणार्‍या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हातातील 50 हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरुन नेली आहे. ही घटना 12 मार्चला रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिस अमलदार एस काळे पुढील तपास करत आहेत.

हप्ता वसूलीसाठी धमकी

वारजे परिसरात एका बिअर शॉपी मालकाकडे हप्ता मागून त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करत टोळक्याने धमकी दिल्याची घटना 13 मार्चला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वारजे भागात बिअरशॉपी आहे. 13 मार्चला सायंकाळी दोघे जण बिअरशॉपीतून दोन बॉक्स घेउन चालले होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना पैसे मागितले.यावेळी आरोपींनी तक्रारदारांवर आरेरावी करत त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हप्ता मागत धमकी दिली. याप्रकरणी वारजे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...