आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील बर्निंग मार्केट:कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये भीषण आग, लाखोंचे नुकसान, तीन तासांनी आग आटोक्यात

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कॅम्प परसिरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमधील दुकानांना शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येथे लहान-मोठी कपड्यांची अनेक दुकाने एकमेकांशी चिटकून आहेत. यामुळे मार्केटमधील दुकानांना लागलेली आग लवकर पसरली गेली. पुणे अग्निशमन दलानुसार रात्री 1 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, परंतु आगीमध्ये दुकानांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विट करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असल्याची माहिती दिली आहे. 'पुण्याच्या कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटवर असलेल्या रेडीमेड कपड्याच्या शेकडो दुकानांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे पुणे कॅन्टोनमेंट फायर ब्रिगेडचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा कर्तव्य बजावून घरी परत जात असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. हसबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत' असे ट्विट देशमुखांनी केले आहे.

या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...