आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Car Accident | In Pimpri | Marathi News | Pune Pimpri A Drunken Driver Drove The Car In Reverse, A Vegetable Seller Was Injured

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:दारुच्या नशेत कारचालकाने टाकला रिव्हर्स गिअर; भाजी व्यावसायिक गंभीर जखमी, पिंपरी चिंचवडमधील घटना

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कारचालकाने दारुच्या नशेत कार पुढे न नेता मागे नेली. त्यामुळे कारने रिव्हर्स वेग धरला त्यामुळे कारच्या पाठीमागे असलेला एक भाजीपाला व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. सोबत एका वडापाव विक्री करणाऱ्या दुकानदारासह अन्य दुकानांचे देखील नुकसान झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना कॅमेरात कैद
ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. सध्या त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत जर आपण पाहिले तर असे दिसते की, कार चालकाने पुढचे गेअर टाकण्याऐवजी मागचे रिव्हर्स गेअर टाकले. त्यामुळे पाठीमागच्या बाजुला असलेल्या वडापाव चालकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. वडापाव दुकानानंतर कारने तिथेच बाजूला असलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या दुकानाला देखील जोरदार धडक दिली आहे. त्यात तो भाजीपाला व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी कारचालक सुभाष वाघमारे याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सुभाष वाघमारे विरोधात शुभम भंडारी यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

चुकीने पडला कारचा रिव्हर्स गेअर

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष वाघमारेंनी मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन केलेले होते. त्यानंतर ते आपल्या मारुती सुझुकी ऑल्टो कारने घराकडे निघाले होते. त्यादरम्यान त्यांनी कारता गेअर टाकला असता, तो गिअर चुकीने रिव्हर्स पडला. त्यामुळे कार पुढे जाण्याऐवजी पाठीमागे धावू लागली. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...