आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका 22 वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह तिघांवर खडकी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीस राहत्या घरी बोलवून खाण्यातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिला बेशुद्ध करत तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या प्रकरणात सदर तरुणाला साथ दिल्याप्रकरणी, याबाबत 22 वर्षीय पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार दीक्षांत गौतम चव्हाण, दुर्योधन भापकर (दोघे रा.खडकी, पुणे ) आणि डॉन (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही ) अशा तीन आरोपीं विरोधात पोलिसांनी बलात्कार, विनयभंग ,धमकी देणे, आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार मे 2019 ते 19 मार्च 2023 यादरम्यान घडला आहे.
असा घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीक्षांत चव्हाण याने पीडित तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून, तिला लग्ना संदर्भात त्याच्या आई-वडिलांना तिच्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याच्या राहत्या घरी बोलावले. त्यानंतर स्लाईस मध्ये काहीतरी गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यास दिल्याने तिला गुंगी येऊन ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपींनी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून त्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये काढला.
जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले
तरुणीला शुद्ध आल्यानंतर, तू माझ्याशी लग्न केले नाही तर, मी तुझा काढलेला व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी तिला स्वतःच्या घरी बोलवून त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली.
संपवून टाकण्याची धमकी
त्यानंतर आरोपी दुर्योधन भापकर यांनी संबंधित अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे असे म्हणून, तरुणीचा हात पकडून त्यांच्याजवळ ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन केले. याचवेळी इतर दोन्ही आरोपींनी तरुणीस 'तू कोणाच्या नादी लागते, तुला भापकर हे कोण आहेत हे माहिती आहेत का? ते तुला संपवून टाकतील' असे म्हणून डॉन नावाच्या आरोपीने त्याच्याजवळ असलेले पाच हजार रुपये तरुणीला देऊन' तू आता एवढे पैसे तुझ्याकडे ठेवून घे व घडलेल्या विषय संपवून टाक, नाहीतर तुला खाल्लास करून टाकायला वेळ लागणार नाही 'अशी धमकी दिली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. पाटील पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.