आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबधात फसवणूक, तरुणीचे विवस्त्र फाेटाे-व्हिडिओ काढले:व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने ठेवले शारिरिक संबंध

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळचा उत्तरप्रदेश मध्ये राहत असलेल्या एका तरुणाचे पुण्यात कामानिमित्त रहाण्यास आल्यानंतर एका 29 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर सदर तरुणीचे विवस्त्र अवस्थेत आंघाेळ करत असताना व्हिडिओ काॅलची रेकाॅर्डिंग करुन ती व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करुन जबरदस्तीने तिच्याशी शारिरिक संबंध करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पिडित तरुणीने काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे. त्यानुसार सुधाकरसिंग उपेंद्रनाथसिंग कुशावह (रा.काेटिया, जि,.गाजीपूर, उत्तरप्रदेश) असे बलात्काराचा, धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. सदरचा प्रकार 19 सप्टेंबर 2021 ते आतापर्यंत घडलेला आहे.

अशी घडली घटना

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी व आराेपी तरुण हे दाेघे एकमेकांचे ओळखीचे आहे. आराेपी सुधाकरसिंग कुशावह याने तरुणीसाेबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लग्न करण्याचे अमिष दाखवले हाेते. तरुणीचे विवस्त्र अवस्थेत आंघाेळ करतानाचे व्हिडिओ काॅलची रेकाॅर्डींग त्याने तरुणीस पाठवली हाेती.

इच्छेविरुध्द शरीरसंबंध

तरुणी काम करत असलेल्या स्पा व्यवसायातून पैसे आणुन दे अन्यथा तुझे नग्न अवस्थेतील व्हिडिओ तरुणीच्या भावाला व इतर नातेवाईकांना पाठवेल. तसेच साेशल मिडियावरही ते आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करुन तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकी आराेपीने दिली हाेती. त्यानंतर त्याने तिला भेटण्यास बाेलवून घेत मारहाण करुन जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुध्द शरीरसंबंध केले.

त्यामुळे पिडित तरुणीने पाेलिसांकडे धाव घेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली. अखेर पाेलिसांनी आराेपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्याच्या महिला सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस कुलकर्णी पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...