आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकल कंपनी स्फोट:हातात हात घातलेले 15 महिलांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळले

पुणे14 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
मृत बहीण भाऊ अर्चना व सचिन - Divya Marathi
मृत बहीण भाऊ अर्चना व सचिन
  • पुणे जिल्ह्यातील उरवडेच्या केमिकल कंपनीत स्फोटाने समाज सुन्न

मुळशी तालुक्यातील उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीत खालचा मजला अाणि वरचा मजला असे दाेन विभाग हाेते. खालच्या मजल्यावर केमिकलचे ४० ते ४५ ड्रम हाेते. अाग लागल्यावर ड्रमने एकदम पेट घेतला. या वेळी वरच्या मजल्यावर पॅकिंगचे काम करत असलेल्या महिलांना खाली येऊन कंपनीबाहेर पडण्यास केवळ एकच मार्ग असल्याने दुसरा मार्ग मिळाला नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी १५ महिलांचे एकमेकांचे हातात हात घातलेल्या मृतदेहांचे सापळे सापडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.

या अागीत कुणाची अाई, पत्नी, बहीण मृत्युमुखी पडले. दुपारी अडीच वाजता लागलेल्या अागीत अापल्या घरातील व्यक्ती अडकल्याचे समजण्यास कुटुंबीय व नातेवाइकांना सायंकाळचे पाच ते सहा वाजले अाणि पीडितांच्या कुटुंबीयांचा दु:खाचा बांध फुटला. मृत सर्वच महिला सर्वसाधारण कुटुंबातील हाेत्या. कुटुंबाला अर्थिक हातभार लावण्याचे काम त्या नाेकरीच्या माध्यमातून करत हाेत्या. अनेक महिलांना लहान मुले असून अागीत त्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांची कुटुंबेच उद्ध्वस्त झाल्याने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत हाेती.

कंपनीतून वेळीच बाहेर पडले अन‌् वाचला जीव
या केमिकल कंपनीत सुमारे ४१ कामगार साेमवारी काम करत हाेते. कंपनीतील कामगार व्यंकटेश कावळे साेमवारी दुपारी जेवण करून कामानिमित्त पिरंगुटला गेला. मात्र, त्याची पत्नी अर्चना अाणि मेहुणा सचिन घाेडके कंपनीत कामास हाेते. अागीत पत्नी व सचिन जळून खाक झाले. मात्र, व्यंकटेशचा जीव वाचला. परंतु याबाबतची माहिती मिळताच त्यास मानसिक धक्का बसला अाणि त्यास रुग्णालयात दाखल करावे लागले.

कंपनीच्या कार्यालयात संगणकावर काम करणारी निशा बाेरकर अाग लागल्यानंतर वेळीच कंपनीतून बाहेर पडली. मात्र, अागीचे चटके बसल्याने ती जखमी झाली. सुदैवाने यात तिचा जीव वाचला. मनीषा पाटील ही कामगार महिला जेवणाच्या वेळेत शेजारी असलेल्या कंपनीत गेली हाेती अाणि त्याच वेळी अाग लागल्याने सुदैवाने ती बचावली गेली. उरवडे गावात राहणाऱ्या घाेरपडे नामक कामगार महिलेने रविवारी लस घेतल्याने ती साेमवारी कामास गेली नाही. मात्र, सहकारी महिलांचा जीव गेल्याने ती बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती
मुळशी तालुक्यातील उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेली आगीची घटना दु:खद आहे. या घटनेत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची नेमण्यात आली आहे. यात चीफ फायर ऑफिसर, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी तसेच पोलिसांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मृतांची नावे
अर्चना कावळे, सचिन घाेडके, संगीत गाेंडे, मंगल माेरगळे, सुरेखा तुपे, सुमन धाेत्रे, सुनीता साठे, संगीता पाेळेकर, माधुरी अांबाेरे, मंदा कुलट, त्रिशाला जाधव, अतुल साठे, सीमा बाेराडे, गीता दिवाडकर, शीतल खाेपकर, सारिका कुदळे, धनश्री शेलार, एस.बलकवडे अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे अाहेत. दरम्यान, कंपनीचे मालक सागर शहा म्हणाले, अाम्ही पुण्यातील रस्ता पेठेत वास्तव्यास असून अागीची घटना समजल्यावर घटनास्थळी दाखल झालाे. कंपनीत फायर ऑडीट झाले होते. दोन दिवसांपूर्वी लागल्याची माहिती चुकीची आहे.

दाेन चिमुरडी पोरकी झाली
अागीत मृत्युमुखी पडलेल्या मंगला अाखाडे हिचे चुलते भाऊ अाखाडे म्हणाले, सुरुवातीला मंगला एका हॉटेलात काम करत हाेती व काही महिन्यांपूर्वी संबंधित कंपनीत पॅकिंगचे काम करू लागली. तिला ६ अाणि ४ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, दोन्ही मुले आता आईच्या मायेविना पोरकी झाली.

बातम्या आणखी आहेत...